महाजागर महामेळाव्यात ओबीसी समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे

महाजागर महामेळाव्यात ओबीसी समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे

भाजपा सरचिटणीस रामचंद्र तिरुके जिपचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे आव्हान

लातूर (प्रतिनिधी) : ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी 14 ऑगस्ट शनिवार रोजी लातूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाजागर महामेळाव्यास ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रामचंद्र तिरुके आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले आहे.

राज्यातील ठाकरे शासनाच्या निष्क्रियतेमुळे ओबीसी समाजाला मिळालेले हक्काचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाला रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रचलेले हे षडयंत्र आहे, असे सांगून रामचंद्र तिरुके आणि राहुल केंद्रे म्हणाले की, गावगाड्यात वाडी तांड्यात राहणारा ओबीसी समाज अनेक जातीत विखुरलेला आहे. मिळालेल्या आरक्षणातून या समाजाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदावर काम करून आपले राजकीय कौशल्य सिद्ध करून दाखविले आहे.

ठाकरे सरकारने रद्द केलेले आरक्षण पुन्हा सन्मानाने मिळावे याबाबत जनजागृती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीचा महाजागर महामेळावा येत्या 14 ऑगस्ट शनिवार रोजी लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय बार्शी रोड येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे, कर्नाटकचे मंत्री प्रभू चव्हाण, माजी मंत्री राम शिंदे, संभाजीराव पाटील निलंगेकर, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर, अनुसूचित जाती मोर्चाचे नरेंद्र पवार, माजी राज्यमंत्री अतुल सावे, अनुसूचित जाती मोर्चाचे सुधाकर भालेराव, खा. सुधाकर श्रंगारे, आ. तुषार राठोड, आ. अभिमन्यू पवार, गोविंदांना केंद्रे, विनायकराव पाटील, गणेशदादा हाके, शिवाजीराव पाटील कव्हेकर, दिलीपराव देशमुख, पाशा पटेल, बब्रवान खंदाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

संपूर्ण लातूर जिल्हा भरातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीच्या सर्व समाज बांधवांनी या महाजागर महामेळाव्यात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रामचंद्र तिरुके आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले आहे.

About The Author