चाकूर तालुक्यातील तीन परिक्षा केंद्रावर ७०२ विद्यार्थ्यांनी दिली जवाहर नवोदयची परिक्षा
चाकूर (सुनिल जाधव) : जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व परिक्षेत काल चाकूर तालुक्यातील तीन परिक्षा केंद्रावर ७०२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली तर याच परिक्षेसाठी १२२ विद्यार्थी हे अनुपस्थित होते.चाकूर शहरातील तीन परिक्षा केंद्रावर गट शिक्षणाधिकारी संजय आलमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिक्षा घेण्यात आली.भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या ३६० विद्यार्थ्यांपैकी ३१३ विद्यार्थ्यांनी तर भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात २२४ पैकी १९१ तर जगत जागृती विद्यामंदिर मध्ये २४० पैकी १९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात केंद्र संचालक म्हणून प्रा.डी.एन.हेमनर,भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात किशोर पाटील तर जगत जागृती विद्यामंदिरात राजीव पिटलवार यांनी काम पाहिले. भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात संस्थेचे सचिव ॲड.प्रल्हादराव कदम, गट शिक्षणाधिकारी संजय आलमले आणि प्राचार्य शेषेराव धोंडगे यांनी परीक्षा केंद्राला भेटी दिल्या.केंद्रप्रमुख बालाजी बावचे,आर,एम,हावडे,विद्याधर माने,गटसाधन केंद्रातील प्रकाश भालके,विजय गुरमे, रवी चिमणदरे इत्यादींनी परिश्रम घेतले,तसेच प्रा. बाळासाहेब बचाटे, प्रा.एच.एच.सय्यद,रवी देशमुख,राजीव नवरखेले, इत्यादी प्राध्यापकांनी परीक्षा सुरळीत होण्यासाठी सहकार्य केले.सर्वच परीक्षा केंद्रांवर कोवीड संसर्गजन्य रोगांची काळजी घेता प्रत्येक वर्गामध्ये सॅनिटायझर ची फवारणी करुन विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले,या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पूर्व परीक्षेसाठी एकूण ८२४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते यापैकी ७०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर १२२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे अद्याप पाठ फिरवली आहे.