महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमीत्त मोफत आरोग्य शिबीर

गायत्रीहॉस्पिटल, लातूर येथे मोफत दमा, श्वसन विकार , क्षयरोग, न्युमोनिया, ॲलर्जी तपासणी व मार्गदर्शन शिबीर:

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमीत्त १४ ऑगस्ट २१ रोजी लातूर येथील गायत्री हॉस्पिटल येथे श्वसन विकार, दमा, ह्रदय रोग कॅन्सर आजारा संदर्भात मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरा मध्ये ज्या रुग्णांना ब्राॅंकोस्कोपी व व्हीडीओ असिस्टेड थोरॅकोस्कोपी ची गरज आहे अशा गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा अशा रुग्णांची तपासणी डाॅ. भराटे आर टी व पुणे येथील तज्ञ डाॅ लक्ष्मिकांत येणगे हे करणार आहेत असे आवाहन रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. लातूर जिल्हयाच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमीत्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते. या अंतर्गत गायत्री हाॅसपीटल, बार्शी रोड नवीन कलेक्टर ॲाफिस समोर लातुर या ठिकाणी मोफत तपासणी व उपचारा बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबीराचे आयोजन शनिवार दि.१४ ऑगस्ट २१ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत करण्यात आलेले आहे या शिबीरा मध्ये सहभागी होण्यासाठी पुर्वनोंदणी करण्यासाठी 9767618044, 7385850038, 7620738337 या क्रमांकावर संपर्क साधावा, व शिबीराचा गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध छातीविकार तज्ञ डाॅ रमेश भराटे यांनी केले आहे.

About The Author