नांदगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

नांदगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव येथे दि. 10 जानेवारी रोजी अभिनव भारत प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवत अभिनव भारत प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अभिनव भारत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!