ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क, विभागातर्फे रात्रीच्या गस्ती दरम्यान विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., विभागीय उप-आयुक्त श्री. पवार,अधिक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हयात अवैध बेकायदेशीर वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही नोंदवत अवैध देशी दारु मद्य वाहतुक करीत असतांना पकडली आहे.

यावेळी 15 देशी दारुचे बॉक्स व एक बोलोरो जीप वाहन क्र. एचएच 25-एएल-4979 जप्त करण्यात आली. यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या मुद्येमालाची किंमत 8 लाख 47 हजार 440 रुपये एवढी आहे. या कारवाईत लातूर विभागाचे निरीक्षक आर.एम.बांगर, लातूर विभागाचे दुय्यम निरीक्षक आर.जी. राठोड, स.दुय्यम निरीक्षक गणेश गोले,अनिरुध्द देशपांडे, निलेश गुणाले, हणमंत मुंडे तसेच यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अवैध दारुविक्री अथवा वाहतुकीवरील कार्यवाही यापुढेही चालु राहणार असल्याचे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क गणेश बारगजे यांनी सांगीतले असून अवैध व परराज्यातील मद्य विक्री, वाहतुक होत असल्यास त्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

About The Author