डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजकार्य – माजी खा.डॉ. सुनील गायकवाड
लातूर (एल पी उगीले) डॉ. अनिल गायकवाड सामाजिक सेवा कुंड च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधून गरजूंना मदत करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल नाहीतर महिला सबलीकरणासाठी गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप, शिलाई प्रशिक्षण शिबिर, वयोवृद्धासाठी नेत्ररोग निदान शिबिर व उपचार, सर्व रोग निदान शिबिर व मोफत औषध वाटप, यासोबतच ज्या ग्रामीण भागात आरोग्याच्या सेवा पोहोचल्या नाहीत अशा ठिकाणी आरोग्य सेवा देता यावी यासाठी मोबाईल ॲम्बुलन्स ची उपलब्धता करून देणे अशा एक नाही हजार कामाचा तपशील देता येईल असे उद्गार लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड च्या कार्याची माहिती तथा तपशील घेण्यासाठी माजी खा. डॉ. सुनील गायकवाड हे गेले असता त्यांनी पुणे येथील सेवाकुंड कार्यालयास भेट दिली. याप्रसंगी संग्रामसिंह भोसले सरकार महाराज (छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज) आणि पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर व लेखक कुंतल अरोरा उपस्थित होते.
सेवा कुंडचे उपाध्यक्ष शहाडे यांनी याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केले. संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि समाजहितासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली.
सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि समाजउन्नतीचा ध्यास घेऊन कार्य करणाऱ्या सामाजिक सेवा कुंडच्या कार्यास माजी खा. गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.
