पंचायत समिती उपसभापती पदावर विमलबाई चिखले यांना संधी द्या – कार्यकर्त्याची मागणी

0
पंचायत समिती उपसभापती पदावर विमलबाई चिखले यांना संधी द्या - कार्यकर्त्याची मागणी

उदगीर (एल पी उगीले) पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी लवकरच होणार आहेत. त्या अनुषंगाने सभापती पद राखीव जरी असले तरी उपसभापती पदावर उदगीरच्या राजकारणात अग्रगण्य समजले जाणारे पंचायत समितीचे माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा संजय गांधी निराधार योजना सदस्य राहिलेले मनोज भाऊ चिखले यांच्या मातोश्री विमलबाई चिखले यांना खूप सभापती पदावर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत आहे. शेल्हाळ ग्रामपंचायत च्या माध्यमातून विकासाची अनेक कामे करून त्यांनी आपला राजकारणाचा विकासात्मक दृष्टिकोन दाखवून दिला आहे.

नावा रूपाला आलेले युवा नेतृत्व मनोज चिखले यांच्या मातोश्री निडेबन गणातून प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या विमलबाई चिखले यांची पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे ,व माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते समजले जाणारे मनोज चिखले यांच्या मातोश्रींना उपसभापतीपदी विराजमान करतील असे सर्वत्र चर्चिले जात आहे. मनोज चिखले हे एक अनुभवी नेतृत्व असून विविध पदावर त्यांनी कार्य करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या पदावर त्यांच्या मातोश्री ची निवड निश्चित मानली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!