लातूर जिल्ह्यातील पाच आरोग्य केंद्राला नॅशनल क्वालिटी अशुरन्स स्टॅंडर्ड चे पारितोषक, त्यापैकी तीन उदगीर विधानसभा मतदारसंघातले!
उदगीर (एल पी उगिले) लातूर जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना नॅशनल क्वालिटी अशुरन्स स्टॅंडर्ड पारितोषक देऊन उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून गौरविले आहे.
या पाच आरोग्य केंद्रापैकी उदगीर विधानसभा मतदारसंघातील हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच जळकोट तालुक्यातील वांजरवाडा आणि आतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला वेळेवर चांगला उपचार केला जावा. असा उद्देश ठेवून उदगीर विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते तथा माजी मंत्री, विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांनी आपल्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहेत. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी आमदार संजय भाऊ बनसोडे यांनी विशेष बाब म्हणून अतिरिक्त ठिकाणी देखील अत्यंत उच्च सेवा देऊ शकणाऱ्या आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. त्यासाठी कोट्यावधीचा निधीही मंजूर करून आणला आहे. यामध्ये प्राधान्याने वाढवणा येथील आरोग्य केंद्राचा ही समावेश आहे. तांत्रिक कारणाने वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले नसले, तरीही त्या आरोग्य केंद्राची संपूर्ण इमारत उभी राहिली आहे. या आरोग्य केंद्रासाठी कोट्यावधीचा निधीही उपलब्ध झालेला आहे. आता तांत्रिक पातळीवर केवळ कर्मचारी नियुक्तीच्या अडचणी आहेत, त्या अडचणी पूर्ण होताच हे आरोग्य केंद्र देखील उदगीर तालुक्यातील एक दर्जेदार आरोग्य केंद्र म्हणून पुढे येऊ शकेल. लोकनेते माजी मंत्री आ. संजय भाऊ बनसोडे यांनी दूरदृष्टी ठेवून केलेल्या विकास कामाची ही पावती आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
त्यांनी उभारलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यंत दर्जेदार समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित केले गेले. हेच त्यांच्या दूरदृष्टीचे एक जिवंत उदाहरण आहे. आ. संजय बनसोडे यांच्या या कामामुळे गोरगरिबांना आरोग्यसेवा तर सहज उपलब्ध होतेच आहे, सोबतच अत्यंत दर्जेदार सेवा देण्यासाठी हे तीन आरोग्य केंद्र काम करत आहेत. याबद्दलही संजय बनसोडे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पूर्वी केवळ तालुक्याच्या ठिकाणी असे आरोग्य केंद्र राहत होते. मात्र आमदार संजय बनसोडे मंत्री होताच त्यांनी आपल्या मतदारसंघातील मोठमोठ्या गावांमध्ये आजूबाजूच्या गावातील जनतेची सोय व्हावी असा उदात्ते हेतू ठेवून आरोग्य केंद्राची निर्मिती केली. उदगीर परिसरातील जनता त्यांना कधीही विसरणार नाही. इतके मोठे विकास काम केले आहे. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देता येईल हा उद्देश निश्चितच कौतुकास्पद आहे. यासंदर्भात गोरगरीब जनता आ. संजय बनसोडे यांचे कौतुक करून त्यांचे आभार मानत आहेत.
