गोल्डन गेट पब्लिक स्कूल चे पहिले स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

0
गोल्डन गेट पब्लिक स्कूल चे पहिले स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

उदगीर (एल पी उगीले)
शिक्षण क्षेत्रातील तब्बल २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या सतीश रे. उस्तुरे अध्यक्ष मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर यांच्या नेतृत्वाखाली, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू झालेल्या ‘गोल्डन गेट पब्लिक स्कूल’चा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. स्वातीताई हुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर देवकत्ते, श्री.गिरी सर, ऍड. भाऊसाहेब जांभोळे आणि शिक्षण अधिकारी बालाजी धमणसुरे साहेब यांची विशेष उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ. स्वातीताई हुडे यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, “एका अनुभवी व्यक्तीने जेव्हा शाळा सुरू केली आहे, तेव्हा निश्चितच या भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.”
तसेच शिक्षण अधिकारी बालाजी धमणसुरे यांनी शाळेच्या शैक्षणिक आराखड्याचे आणि शिस्तीचे कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी शाळेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “शाळेचे पहिलेच वर्ष असूनही विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. २९ वर्षांचा दांडगा शैक्षणिक अनुभव पाठीशी असल्याने या शाळेतून उद्याचे सुजाण नागरिक घडतील, यात शंका नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां साठी अशा दर्जेदार शैक्षणिक संस्थांची गरज आहे.”
पालक वर्गातून उदगीर चे प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. झैद शेख व इंजिनियर धनराज गोला या पालकांनी आपल्या शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले . “परत आम्ही लहान होऊन या शाळेत प्रवेश घ्यावा की काय? असे आम्हा पालकांना वाटत आहे. शाळेचे नियोजन पालकांशी समन्वय साधणारे शिक्षकपण शिस्त, मूल्यसंस्कार, आत्मविश्वास आणि नवकल्पक अध्ययन पद्धती याचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणतात.”
शाळेचे हे पहिलेच वर्ष असूनही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी, नृत्यांनी आणि नाटकांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘अनुभवातून शिक्षणाकडे’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या शाळेने पहिल्याच वर्षी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. मातृभूमी विद्या संकुल चे सचिव वं प्राचार्या सौ. उषा कुलकर्णी, शाळेचे शैक्षणिक सल्लागार श्री. हैदर अली सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वनिता सुगंधी, सौ.अंजुम शेख, सौ .दीपिका बिरादार, सौ.अंजली वडगावकर, सौ .लक्ष्मी वल्लपवाड, अलविरा शेख, कांचन गिरी, कुशाल बिरादार व शाळेतील सर्व सेविका तसेच मातृभूमी विद्या संकुल मधील सर्व शिक्षक प्रा.विभीषण मददेवाड, प्रा.रणजीत मोरे, प्रा.उस्ताद सय्यद, प्रा.शिवांगी वट्टमवार, प्रा.अन्वेष हिपळगावकर, प्रा.दीक्षा स्वामी, प्रा.राहुल जाधव, प्रा.प्रतीक्षा काकऱे, प्रा.नेहा वाघमारे, प्रा.मीरा पाटील, जगदीशा ओंकारे, अश्विनी काळे, दयानंद टाके, विवेक देवर्षी, मयूर मुळे, देवा डोंगरे व सर्व सेवक यांचे विशेष सहकार्य लाभले. या सोहळ्याला आवर्जून श्री .सुधीर पाटील, श्री.जिरोबे संतोष,श्री. मल्लिनाथ आडेप्पा, श्री.किरण होलसंबरे,श्री. मनोज गुरुडे, श्री धनुरे शेषेराव, श्री मलवाडे , डॉ.पंडित देवशेट्टे ,शाळेचे सर्व पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .स्वाती भांगे व सौ.अर्चना मठपती मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ .निलंबिका पांचाळ यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!