“अवैध शस्त्र व जुगार व्यवसायाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची सलग धडक कारवाई”
लातूर ( एल पी उगीले) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणे व बेकायदेशीर जुगार व्यवसायास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग धडक कारवाया करून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून घातक शस्त्रे, रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन व वाहने असा एकूण ₹५,८३,६००/- पेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने नियोजनबद्धरीत्या पार पाडली.
दिनांक १६/०२/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे २०.३० वा. नवीन रेणापुर नाका, शालीमार फंक्शन हॉल समोर, साई रोड, आर्वी येथे विनापरवाना लोखंडी तलवार बाळगून असलेला इसम नामे गोविंद राजकुमार कांबळे (वय ३१ वर्षे, रा. नवरत्न नगर, साई रोड, आर्वी, ता. जि. लातूर) हा आढळून आला. त्याच्या कडून सुमारे २ फूट ३ इंच लांबीची, लाल रंगाच्या म्यानासह लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.सदर आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिनांक १७/०२/२०२६ रोजी दुपारी १५.२० वा. जुना रेणापुर नाका, बस स्थानक क्र. २, लातूर येथे पुन्हा एकदा गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.राजेश सिताराम पवार (वय ३२ वर्षे, रा. राजीव नगर, लातूर) हा त्याच्या टाटा इंडिका व्हिस्टा (क्र. MH 43 X 7820) या लाल रंगाच्या कारमध्ये विनापरवाना लोखंडी तलवार बाळगताना मिळून आला.त्याच्याकडून २ फूट ५ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. यावेळी तलवार व संबंधित वाहन असा अंदाजे ₹१,००,१००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिनांक १६/०२/२०२६ रोजी रात्री २३.४५ वा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर येथे सार्वजनिक मोकळ्या जागेत “तिर्रट” नावाचा जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला.
छाप्यामध्ये खालील आरोपी जुगार खेळताना मिळून आले :अमोल रामराव हसनाळे (वय ३६ वर्षे, रा. ज्ञानेश्वर नगर, लातूर),जिलानी रहीमसाब तांबोळी (वय ६५ वर्षे, रा. बौद्ध नगर, लातूर),फरीद ईसाक शेख (वय २० वर्षे, रा. पाचपिर नगर, लातूर),अवधुत महादेव संन्मुखराव (वय २० वर्षे, रा. राजीव नगर, लातूर),
सदाम मुस्ताक फारुकी (वय ४३ वर्षे, रा. महाराणा प्रताप नगर, लातूर)
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच पाच दुचाकी वाहने असा एकूण एकूण मुद्देमाल ₹५,८३,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच
रवी कोंडीबा दोनगहु,राजेश पवार व दत्ता कांबळे हे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगण्याच्या व बेकायदेशीर जुगार व्यवसायाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सक्त सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवत आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना शस्त्र बाळगणे हे गंभीर व दंडनीय गुन्हे असून अशा प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध धंदा किंवा कायद्याच्या विरुद्ध कृती आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. लातूर जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी व शांततामय वातावरण निर्मितीसाठी कटिबद्ध आहे.
