विभागीय वादविवाद स्पर्धेत गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयाचा संघ विजेता
उदगीर-(एल पी उगिले ) येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी वाद विवाद स्पर्धा विभागीय पातळीवर घेतली जाते. या स्पर्धेमध्ये गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनींच्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.
स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे हे 46 वे वर्ष आहे. एकूण 45 संघातील 90 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत दर्जेदार पद्धतीच्या या स्पर्धा संपन्न झाल्या. यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्रजी अलुरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, नरेंद्र मेडेवार, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार मस्के , भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी मधुकरराव वटृमवार, शंकरराव लासुणे,शिवाजी बिराजदार, मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर, अंकुश मिरगुडे हे उपस्थित होते.
परीक्षक म्हणून कार्य केलेल्या नयन राजमाने व बालाजी भंडारे यांनी मनोगतातून वक्तृत्व कसे असावे? नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून जबाबदारी पार पाडत जाणे, अनुभव घेणे अशा गोष्टी अशा स्पर्धेतून प्राप्त होत असतात. अपयश पचवण्याची तयारी असावी. स्पर्धा जरूर असावी, पण त्यात संवेदना असावी. असे विचार मांडले.
प्रमुख पाहुणे गजानन भातलवंडे यांनी अशा स्पर्धेतून नवीन अनुभव मिळतात, संगत चांगली करा चांगल्या लोकांच्या सहवासात रहा, नेहमी प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल असे सांगितले.
नरेंद्र मेडेवार यांनी वक्तृत्व ही कला आहे. मोठी माणसे वक्तृत्वामुळे अधिक मोठी होतात, असे विचार मांडले . प्राचार्य राजकुमार मस्के यांनी वादाला विवादाची आणि विवादाला वादाची जोड मिळाली की आयुष्य सुंदर होते. यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होते. अपयशही पचवता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील असावं असं वक्तव्य केलं.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सुरेंद्र आलूरकर यांनी जिंकण्याच्या ईर्षेनेच स्पर्धेत सहभागी व्हावे, आपले मत, आपले विचार आपल्याला ठामपणे मांडता आले पाहिजेत. तुमचं भवितव्य तुम्हीच ठरवणार आहात, म्हणून चांगली संगत,प्रामाणिकपणा सतत कष्ट करण्याची तयारी ठेवा असे विचार मांडले.
या मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस ढाल आणि १०हजार रुपये पारितोषिकाचे मानकरी लातूर येथील गोदावरी देवी लाहोटी विद्यालय ठरला आहे. तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 7000 रुपये पारितोषकाचे मानकरी लातूर येथील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे.तृतीय पारितोषक शाहू विद्यालय शेळगाव यांना प्राप्त झाले आहे. चतुर्थ संघ लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर, सर्वपंचम संघ संभाजीराव बडगीर माध्यमिक विद्यालय ममदापूर हे मानकरी ठरले आहेत.
ग्रामीण मुलीत प्रथम गायत्री अदनाक, द्वितीय आरती मोकळे, तृतीय सायली पाडोळे , चौथी अक्षरा इप्पर, पाचवी प्रज्ञा घोडके, ग्रामीण मुलात प्रथम अभिलाष निरगुडे, द्वितीय शुभम देवनाळे, तृतीय शिवशंकर कदम, चौथा निशांत तांबे पाचवा संकेत कदम , शहरी मुलीत प्रथम वैदेही पाटील, द्वितीय रजनी कलमुरे, तृतीय प्रियंका मुंढे ,चौथी श्रेयणी चिद्रेवार व स्नेहल हंचाटे, पाचवी श्रुति माचपल्ले, शहरी मुलात प्रथम खुजाओद्दीन नाजमोद्दीन, द्वितीय संकेत शेरीकर, तृतीय पुष्कर जाधव व श्रीतेज कुलकर्णी, चौथा हर्षल चव्हाण, पाचवा विश्वजीत जाधव या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया गोविंदवाड व करुणा गायकवाड यांनी केले. अहवाल वाचन वादविवाद प्रमुख अनिता मुळखेडे यांनी केले. स्वागत व परिचय लक्ष्मी चव्हाण यांनी केले, निकाल वाचन अनिता येलमटे व अंबिका पारसेवार, वैयक्तिक गीत प्रीती शेंडे, आभार संजयराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कल्याणमंत्र रूपाली थोरात यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट, माधव मठवाले, वादविवाद सहप्रमुख राहुल नेटके, निलेश मांडवकर व्यवस्थेतील सर्वच शिक्षकांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.
