छत्रपती शिवाजीराजे हे युवकांच्या आचरणाचा विषय झाले पाहिजेत – डॉ. हनुमंत भोपाळे
उदगीर (एल पी उगीले)छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील सोनेरी पान असून त्यांनी सातत्याने राजेशाहीत लोकशाही व्यवस्थेचा आग्रह धरला होता. स्वराज्य म्हणजे लोकांचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्ष आणणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय हे युवकांच्या आचरणाचा विषय झाले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले.
उदगीर येथील दि.लिं. होळीकर प्रतिष्ठान व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दावणगाव येथे आयोजित बहि:शाल व्याख्यानमालेत छत्रपती शिवाजीराजे: वसा आणि वारसा या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दि.लिं.होळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साखरे हे होते. तर व्यासपीठावर निळकंठ भद्रशेट्टे , डॉ दत्ताहरी होनराव, डॉ .सुशिलप्रकाश चिमोरे, यशवंतराव बिरादार व किशनराव बिरादार हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय दि.लिं.होळीकर प्रतिष्ठानचे सचिव डॉ दत्ताहरी होनराव यांनी केला.
बहि:शाल व्याख्यानमालेत
डॉ. भोपाळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज वसा आणि वारसा’ या विषयावर बोलताना शिवरायांच्या विचारांची प्रस्तुतता आणि त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीने कसा जोपासावा याचे विश्लेषण केले. रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर किशनराव बिरादार यांनी आभार मानले.
