छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंजिनीयर विश्वजीत गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराच्या आयोजन

0
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंजिनीयर विश्वजीत गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराच्या आयोजन

उदगीर (एल पी उगिले) संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आणि तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असा संकल्प करून इंजिनीयर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये उदगीर परिसरातील आणि पंचक्रोशीतील तरुणांनी आणि तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 103 रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन केले.
इंजिनीयर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने या परिसरामध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. महिला सबलीकरणाचा विषय घेऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने त्यांना शिवणकला प्रशिक्षण शिबिर घेऊन प्रशिक्षित करण्यात आले. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे म्हणून शिलाई मशीनही मोफत भेट देण्यात आल्या. या परिसरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचे दप्तर तसेच वह्या पुस्तके पेन पेन्सिल कंपास बॉक्स अशा पद्धतीचे अनेक शिक्षण उपयोगी साहित्य भेट दिले आहेत इतकेच नाही तर कित्येक विद्यार्थ्यांना गणवेशही दिलेला आहे. अशा या लोककल्याणकारी विचारधारा डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या इंजिनीयर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन उदगीरकरांनी या प्रतिष्ठानला साथ दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!