डॉ. जे. एम. पटवारी यांची सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

0
डॉ. जे. एम. पटवारी यांची सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

उदगीर (एल पी उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. जे. एम. पटवारी यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या पर्यावरणशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. पर्यावरणशास्त्र विषयाच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉ. पटवारी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!