विलास साखर कारखान्याच्या 11,11,111 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न

0
विलास साखर कारखान्याच्या 11,11,111 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न

लातूर (एल पी उगीले)
विलास सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम 2025-26 मधील उत्पादित 11,11,111 साखर पोती पूजन सोहळ्यास कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वैशालीताई विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते तर खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
याप्रसंगी लातूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन माजी आ. वैजनाथ शिंदे, ॲड. प्रमोद जाधव, अशोक काळे, रविंद्र काळे, अनंतराव देशमुख, ॲड.प्रविण पाटील, विजय देशमुख, जगदीश बावणे, सुनिल पाटील, धनंजय देशमुख कार्यकारी संचालक आबासाहेब देशमुख यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक मंडळ,अधिकारी -कर्मचारी, सभासद,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!