गोल्डन गेट पब्लिक स्कूलने एका वर्षात उल्लेखनीय प्रगती केली – नगराध्यक्ष सौ स्वाती हुडे

0
गोल्डन गेट पब्लिक स्कूलने एका वर्षात उल्लेखनीय प्रगती केली - नगराध्यक्ष सौ स्वाती हुडे

उदगीर (एल पी उगीले)
शिक्षण क्षेत्रातील तब्बल २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले सतीश रे. उस्तुरे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले. ते मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर या संस्थेचे अध्यक्ष असून यांच्या नेतृत्वाखाली, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू झालेल्या ‘गोल्डन गेट पब्लिक स्कूल’चा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. हा देखना सोहळा पाहिल्यानंतर या शाळेने केलेली प्रगती डोळ्यात भरते. असे विचार या उपक्रमाच्या
उद्घाटक नगराध्यक्ष सौ. स्वातीताई हुडे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर देवकत्ते, गिरी सर, ऍड. भाऊसाहेब जांभोळे आणि शिक्षण अधिकारी कार्यालयातील केंद्रप्रमुख बालाजी धमणसुरे यांची विशेष उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ. स्वातीताई हुडे यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, “एका अनुभवी व्यक्तीने जेव्हा शाळा सुरू केली आहे, तेव्हा निश्चितच या भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.” तसेच बालाजी धमणसुरे यांनी शाळेच्या शैक्षणिक आराखड्याचे आणि शिस्तीचे कौतुक केले.
याप्रसंगी पालक वर्गातून उदगीर चे प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. झैद शेख व इंजिनियर धनराज गोला या पालकांनी शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले . “परत आम्ही लहान होऊन या शाळेत प्रवेश घ्यावा की काय? असे आम्हा पालकांना वाटत आहे. शाळेचे नियोजन, पालकांशी समन्वय साधणारे शिक्षक वर्गाची शिस्त, मूल्यसंस्कार, आत्मविश्वास आणि नवकल्पक अध्ययन पद्धती याचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणतात.”
शाळेचे हे पहिलेच वर्ष असूनही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी, नृत्यांनी आणि नाटकांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘अनुभवातून शिक्षणाकडे’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या शाळेने पहिल्याच वर्षी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. मातृभूमी विद्या संकुल चे सचिव व प्राचार्या सौ. उषा कुलकर्णी, शाळेचे शैक्षणिक सल्लागार हैदर अली, मुख्याध्यापिका सौ. वनिता सुगंधी, सौ.अंजुम शेख, सौ .दीपिका बिरादार, सौ.अंजली वडगावकर, सौ .लक्ष्मी वल्लपवाड, अलविरा शेख, कांचन गिरी, कुशाल बिरादार व शाळेतील सर्व सेविका तसेच मातृभूमी विद्या संकुल मधील सर्व शिक्षक प्रा.विभीषण मद्देवाड, प्रा.रणजीत मोरे, प्रा.उस्ताद सय्यद, प्रा.शिवांगी वट्टमवार, प्रा.अन्वेष हिपळगावकर, प्रा.दीक्षा स्वामी, प्रा.राहुल जाधव, प्रा.प्रतीक्षा काकऱे, प्रा.नेहा वाघमारे, प्रा.मीरा पाटील, जगदीशा ओंकारे, अश्विनी काळे, दयानंद टाके, विवेक देवर्षी, मयूर मुळे, देवा डोंगरे व सर्व सेवक यांचे विशेष सहकार्य लाभले. या सोहळ्याला आवर्जून सुधीर पाटील, जिरोबे संतोष, मल्लिनाथ आडेप्पा, किरण होलसंबरे, मनोज गुरुडे , धनुरे शेषेराव, मलवाडे, डॉ.पंडित देवशेट्टे ,शाळेचे सर्व पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .स्वाती भांगे व सौ.अर्चना मठपती यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. निलंबिका पांचाळ यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!