लव्हु वाडीकर यांच्यासह पाच शेतकरी जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल पी उगीले)
सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व वेगवेगळे उपक्रम राबवून शेतीमध्ये उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने विशेष कार्य करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट उपक्रमशील शेतकरी म्हणून गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या उदगीर पासून थोड्याच अंतरावर उत्कृष्ट शेती करणाऱ्या सीमाभागातील कमालनगर परिसरातील उपक्रमशील पाच शेतकऱ्यांचा सत्कार सन्मान कृषी मेळाव्यात संपन्न झाला .कर्नाटक राज्याचे वन व अरण्य मंत्री, तथा बिदर जिल्ह्याचे पालकमंत्री ,तथा भालकी तालुक्याचे आमदार ईश्वर खंड्रे व बिदर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिल्पा शर्मा, बिदर जिल्हा कृषी अधिकारी सौ. देवीका, उपकृषी अधिकारी एन अन्सारी , प्रेमदास, तालुका कृषी अधिकारी धुळप्पा , पांडुरंग पाटील, नवनाथ तपशाळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.त्यावेळी संदीप आमदापुरे (देशमुख), गोविंद वाडीकर, शत्रुघ्न चव्हाण,सीमाभागातील औराद व कमलनगर तालुक्यामधील गंगनबीड गावातील श्री लहू लक्ष्मणराव वाडीकर या उपक्रमशील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. लहू वाडीकर हे शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहेत. आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढतात . शेतमालाला प्राधान्या भाजीपाला साठी मार्केट सुद्धा व्यवस्थित उपलब्ध करून देतो. शेतकऱ्यांना भाजीपाला पिकामध्ये मिरची, टमाटा, कारला, काकडी ,मटकी असे विविध पिके नव नवीन, नवीन नवीन वाण, चांगल्या प्रतीचे उत्तम बियाणे घेतात, उत्पन्न चांगल्या प्रतीचे देतात. कृषी विभागाला आपला वेगळा ठसा उमटून दाखवतात . कृषी विभाग सातत्याने त्यांच्या या विक्रमी उत्पादनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणी करून त्यांनी इतरही अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे म्हणून विनंती केली जाते. कृषी प्रशिक्षण आपल्या शेतामध्ये बळीराजा निवास्थानी ठेवतात. पारंपारिक शेतीला आधुनिकीकरणाची जोड देऊन यंत्रसामग्री वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकार करून आपल्या उत्पादनात बदल घडवतात. आपल्या शेतामध्ये सेंद्रिय शेती बद्दल जिल्हास्तरीय कृषी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना बोलवतात, व शेतकरी वर्गांना सुद्धा त्याचा फायदा होतो. सेंद्रिय शेती व रासायनिक शेतीचे फायदे तोटे ते सर्व शेतकऱ्यांना सांगीतले जाते. सेंद्रिय शेतातून निघणारी भाजीपाल्याची पिके ही मार्केटमध्ये टिकाऊ असतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीतील चांगल्या प्रतीचे भाजीपाल्यांना मार्केटही मिळते. शेतीमध्ये राबवणाऱ्या नवीन प्रयोगांना त्यांनी तालुक्यापुरतं मर्यादित न ठेवता जिल्हास्तरीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.ते कृषी अधिकाऱ्याच्या, सानिध्यातून आपल्या शेतामध्ये शेततळे ,कांद्याची शेड,. ठींबक इरिगेशन एरिया, बागायत आंबा, लिंबू असे विविध फळांचे उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेतात. युवा पिढीने सुद्धा कृषी कडे वळावे व समग्र शेती करावी . असे आवाहन वाडीकर यांनी केले आहे.
