सामाजिक जीवन जगणाऱ्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानेच साजरा करावा माजी आ. सुधाकर भालेराव

0
सामाजिक जीवन जगणाऱ्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानेच साजरा करावा माजी आ. सुधाकर भालेराव

उदगीर (एल पी उगीले) शिवसेनेचे मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक तथा शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या ६३ व्या वाढदिवसा निमित्त लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विशेषतः उदगीर परिसरात अनेक सामाजिक उपक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एखादा सामाजिक जाणीवा घेऊन जगणारा नेता असेल तर त्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने झाला पाहिजे. असे विचार शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा माजी आ. सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केले. उदगीर तालुक्यात ठीक ठिकाणी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून ६३ लोकांना दृष्टीदान देण्याचे काम शिवसेना उदगीर (लातूर ग्रामीण) च्या वतीने करण्यात आले.मौजे मोघा ता.उदगीर येथे शिवसेना उदगीर, लातूर ग्रामीण च्या वतीने नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करून रुग्णाना मोफत शस्त्रक्रिया करून दृष्टी देणायचे समाज उपयोगी शिबीर राबवण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन माजी आ. सुधाकर भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे आयोजन शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख (ग्रामीण) चंद्रकांत टेंगेटोल, डॉ सागर समगे,डॉ महेश समगे, डॉ प्रशांत गायक,अनिल पंचाक्षरी शहरप्रमुख उदगीर, शिबिराचे संयोजन शिवाजी बिरादार यांनी केले. यावेळी गावचे सरपंच प्रमोद काळोजी, संदीप कुलकर्णी,अभंग बिरादार,प्रदीप पाटील,विनोद सुतार,संतोष श्रीमंगले, नागनाथ बिरादार,लखन कांबळे,व्यंकट कसबे, दिलीप पाटील,सुजर लिंगोजी, बालाजी पाटील, रजनीकांत दहीकांबळे, सुभाष बिरादार, किशोर कबाडे,ज्ञानेश्वर रोडगे,सूरज नराचे, रामेश्वर सुर्यवंशी,शिवदास विरकपाळे, मारुती गायकवाड,मारोती साळुंखे, धनराज सूर्यवंशी,मनोहर सुतार, बळंवन्त हणकुने,मुद्रिकाबाई कबाडे, ललिताबाई सूर्यवंशी,अभंग रुमने, बाबुराव लिंगोजी,अरुणाबाई लिंगोजी, अनुशाबाई जमादार,विश्वनाथ हंगरगे, गेंदाबाई कांबळे,ज्योती कांबळे,जयश्री कांबळे,संताबाई मेहत्रे,वैजनाथ सूर्यवंशी, रामभाऊ जेजुरे,उत्तम रोडगे, सुदाम गायकवाड, कलुबाई सूर्यवंशी, लक्ष्मण औडोबा,प्रल्हाद जेजुरे,वंदाबाई लिंगोजी,शानुरबी शेख,शबाना शेख, महमूद शेख,नरसिंग कांबळे,निर्मला कळोजी,चंद्रकला येगाडे,वच्छला मालूले,प्रभू मलूले आदी रुग्ण व गावकरी नागरिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!