महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्रीकांत मतवरे तर सचिव पदी रामचंद्र तिरुके

0
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्रीकांत मतवरे तर सचिव पदी रामचंद्र तिरुके

उदगीर (एल पी उगीले) शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाची नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत मध्वरे आणि सचिव पदी रामचंद्र तिरुके तसेच सदस्य म्हणून बसवराज गुणवंतराव पाटील मलकापूरकर, सदाशिव माधव कुलकर्णी, अरविंद पंढरीनाथ पाटील, शिवराज हावप्पा वल्लापुरे, विश्वनाथ मुडपे, दीपक बलसुरकर, रसूल पठाण, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, डॉ. दीपक चिद्दरवार, माधव भोसले यांची निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर तथा इतर मान्यवर कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, अ‍ॅड.अजय दंडवते, डॉ. रामप्रसाद लखोटिया,प्रशांत पेन्सलवार , महादेव नौबदे यांच्या उपस्थितीत वाचनालयाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी वाचन प्रेरणा अभियान, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लेखक भेट, व्याख्यानमाला, पुस्तक प्रदर्शन तसेच आधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून वाचनालयाच्या कार्यात अधिक गतिमानता येणार असून शहरातील वाचक, विद्यार्थी व साहित्यप्रेमींना विविध उपक्रमांचा लाभ होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!