सौ. उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड, उदगीर देवणी जळकोट परिसरात आनंदोत्सव
उदगीर (एल पी उगिले) उदगीर, देवणी आणि जळकोट या तिन्ही तालुक्यांमध्ये आपल्या सहकार क्षेत्रातून धबधबा निर्माण करणारे सहकार महर्षी रामचंद्र पाटील तळेगावकर यांच्या सुनबाई सौ उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांची निवड लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने ही निवड झाली आहे उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरवसे यांची निवड झाली आहे.
सहकार महर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांच्या भावाच्या पत्नीला हा सन्मान मिळाला आहे. राजकीय परिवारातून आणि समाजकारणाची जाण असलेल्या तळेगावकर परिवाराकडून निश्चितच सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचे अपेक्षा लोक व्यक्त करू लागले आहेत.
पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवून जो सन्मान दिला आहे, त्या पदाला पात्र राहून आपण लोकसेवा करू अशा पद्धतीचे आश्वासन या निवडीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नूतन सभापती उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांनी दिले आहे.
