माळेवाडी येथे रि. पा. इं.(आ) च्या महिला आघाडीच्या शाखेची स्थापना

0
माळेवाडी येथे रि. पा. इं.(आ) च्या महिला आघाडीच्या शाखेची स्थापना

उदगीर (एल पी उगीले) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महिला आघाडी ची माळेवाडी येथील शाखेची स्थापना करण्यात आली.
रिपब्लिकन पक्षमजबूत करून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व पक्ष उदगीर तालुक्यात मजबूत करण्यासाठी देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या महिला आघाडीची शाखा उदगीर तालुक्यातील माळेवाडी या गावात शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास युवक जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, उदगीर तालुकाध्यक्ष ॲड. प्रफुलकुमार उदगीरकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष लता सूर्यवंशी, नितीन गायकवाड, नरसिंग कांबळे उपस्थित होते. तर शाखाध्यक्ष शाहूबाई कांबळे, उपाध्यक्ष राजाबाई गुरुदाळे, सचिव रेखा भोंगे, आवडताबाई कांबळे, राधाबाई थोरे, हरूबाई कांबळे, राधा कांबळे, अंजली कांबळे अशी कार्य करण्याची निवड झाली, तर या कार्यक्रमाचे संयोजक दिलीप कांबळे, नितीन कांबळे, नागेश कांबळे होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!