छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात शहीद दिन हुतात्मा दिवस म्हणून साजरा
उदगीर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात भारतातील थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव थापर व शिवराम राजगुरू यांचा शहीद दिन हा हुतात्मा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे होते. तर विचार मंचावर प्रबंधक बी.के.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात डॉ. मांजरे म्हणाले की,सॅन्डर्स यांनी लाला लजपतराय यांची हत्या केली. लाला लजपतराय यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत खूप मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी या तीन क्रांतिकारकांनी सॅन्डर्स या अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या. ब्रिटिशांनी उत्तरप्रदेशातील लाहोर येथील तुरूंगात 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी फाशी दिली. हा दिवस तरुण पिढीला देशभक्ती, त्याग आणि धैर्याची आठवण करून देतो. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मोठी प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयंती समिती प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहसंयोजक डॉ. डी.बी.मुळे यांनी मानले.या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने घेण्यात आला.
