आयपीएल क्रिकेट सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपींना अटक, 4.50 लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
आयपीएल क्रिकेट सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपींना अटक, 4.50 लाखांचा मुद्देमाल जप्त.

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशावरून, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, व पोलीस ठाणे स्तरावर सातत्याने प्रभावी कारवाया करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखे कडून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल ₹4,50,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवैध व्यवसायांविरुद्ध माहिती संकलन व कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, आयटीआय कॉलेज, निलंगा परिसरात गस्त घालत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, दादगी ते भंगार चिंचोली रोडवरील दादगी शिवारात काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा जुगार चालवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने छापा
सायंकाळी सुमारे 20:15 वाजण्याच्या सुमारास पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून खालील आरोपींना ताब्यात घेतले.लखन ऊर्फ बाबा महापु कांबळे (वय 29 वर्ष, रा. मिलिंद नगर पेठ, निलंगा, जि. लातूर),पवन दयानंद कांबळे (वय 26 वर्ष, रा. मिलिंद नगर पेठ, निलंगा, जि. लातूर) त्यांच्या अंगझडती दरम्यान आरोपींकडून क्रिकेट सट्टा जुगारासाठी वापरण्यात येणारे विविध कंपन्यांचे एकूण 6 मोबाईल फोन, सट्टा व्यवहार नोंदविण्यासाठी वापरलेले कागदपत्र, 1 बॉलपेन,होंडा अक्टीवा स्कूटर (MH 24 BF 7217) असा एकूण ₹4,50,000/- रुपयांचा मुद्देमाल, विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, ते आयपीएल क्रिकेट सामन्यावर (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) लोकांकडून फोनद्वारे संपर्क साधून सट्टा स्वीकारत होते. सदर सट्टा व्यवहार मुंबई येथील ‘रवि शेट’ नावाच्या बुकीसाठी चालविला जात होता. आरोपी रोजचा सट्टा व्हॉट्सअपद्वारे बुकीकडे पाठवत असत व त्याबदल्यात त्यांना १० टक्के कमिशन मिळत होते. ही संपूर्ण कारवाई संगनमताने व आर्थिक फायद्यासाठी केली जात असल्याचे उघड झाले आहे. सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य बुकीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे,पोलीस अंमलदार प्रदीप स्वामी, युवराज गिरी, नवनाथ हासबे, राजेश कंचे, जमीर शेख, राहुल कांबळे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!