साम्यक विद्यार्थी आंदोलनांच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन
अहमदपुर (गोविंद काळे) : येथील तहसिलदार मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साम्यक विद्यार्थ्यी आंदोलनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने महाराष्ट्रात १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने तहसील कार्यालय अहमदपूर मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
तब्बल दिड वर्षांनंतर शाळा सुरू करन्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ही आनंदाची बातमी आहे.पण सरकारने शाळा सुरू करीत असताना कोरोना गटातील Vaccine जे बाजारात सहज उपलब्ध असणारे न्यूमोनिया आणि ईन्फलूयंझा ही लस कोरोनाचा धोका २५% कमी करते आणि जगभर हेही सिध्द झाले आहे की कोरोनापेक्षा ईन्फलूयंझा आजाराने मुले जास्त मृत्यू पावली आहेत.कोरोनाची लस लहान मुलांसाठी येईल तेव्हा येईल.पण सद्यस्थितीत ही लस ऊपलब्ध आहे आणि तिचा वापर करून बालकांचे आरोग्य सुरक्षित करू शकतो. आणि ह्या गोष्टीची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग तसेच इतर संबंधित कार्यालयास द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी उपस्थित सम्यक विद्यार्थी आंदोलन लातूरचे जिल्हाप्रसिध्दी प्रमुख निलेश चंद्रकांत कांबळे,योगेश गुळवे, रोहन गुळवे,सूरज गुळवे त्याचसोबत वंचित बहुजन आघाडीचे मनोहरराव पाटील,तालुकाध्यक्ष सहदेव व्होनाळे, महासचिव प्रल्हाद ढवळे, सारीपुत्र ढवळे इतर सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी उपस्थित होते.