इस्त्री चालकाकडुन प्रामाणीकपणाचे जिवंत उदाहरण..

इस्त्री चालकाकडुन प्रामाणीकपणाचे जिवंत उदाहरण..

खिशात मिळालेले 5000 रुपये परत..
अहमदपुर (गोविंद काळे) : शहरातील नागोबा नगर येथे उमाकांत माधवराव परीट यांचे इस्त्री चे (प्रेसचे) दुकान आहे. या दुकानात महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ अनिल कांबळे हे नियमितपणे आपले ड्रेस प्रेससाठी टाकतात. दि 15 अॉगस्ट रोजी प्रा अनिल कांबळे यांनी आपले ड्रेस प्रेससाठी दिले पण पँटच्या खिशात 5000 रूपये विसरले व तशीच कपड्याची बँग प्रेसच्या दुकानात दिली. आपले पैसे पँटच्या खिशात आहेत याची कल्पनाही प्रा अनिल कांबळे यांना नव्हती.दुपारी उमाकांत परीट यांना पँट प्रेस करत असताना खिशात काहीतरी आहे याची जाणीव झाली. त्यावेळी खिशे चेक केले असता त्यात पैसे आढळून आले. तात्काळ उमाकांत परीट यांनी प्रा अनिल कांबळे यांचा मोबाईल नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला व मोबाईलवर कॉल करुन पैसे आढळून आल्याचे सांगितले व खिशातील 5000 रुपये परत केले. तेंव्हा उमाकांत परीट यांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. त्यावेळी बाबुराव भरडे आप्पा, नय्युम शेख, दिलीप भालेराव, रामदास बने, मनोज उकीरडे, बुधवारे, महेश कदम उपस्थित होते. प्रा अनिल कांबळे यांना या घटनेबद्दल विचारले असता ते म्हणाले की मला पैशे खिशात राहील्याची कल्पनाही नव्हती पण उमाकांत परीट यांच्या सारखी माणसे समाजात असल्याने व आजच्या घटनेने आजही समाजात माणुसकी व प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय आला . व त्यामुळेच मी उमाकांत परीट यांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देवुन सत्कार केला.

About The Author