अहमदपूर येथे संविधान बचाव देश बचाव मोटार सायकल रॅली !

अहमदपूर येथे संविधान बचाव देश बचाव मोटार सायकल रॅली !

अहमदपूर (गोविंद काळे) : वंचित बहुजन आघाडी,भा.द.पँथर व जनआंदोलन प्रबोधन सामाजिक संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्यदिनानिमित्त “संविधान बचाव देश बचाव”या मोटारसायकल रॅलीचे मा.सुप्रीयभाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते पण अचानक काल अहमदपूर पोलीस प्रशासन यांनी मा.जिल्हाधिकारी,लातुर यांच्या सुचनेप्रमाणे रॅली न काढण्यास विनंती केली.त्यामुळे मोटार सायकल रॅली रद्द करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उपस्थित कार्यकर्त्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

About The Author