जीव वाचवणार्या रूग्णवाहिका चालकांचा सत्कार
नाशिक/निफाड (आकाश शेटे) : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जग त्रस्त झालेले असताना प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यात आरोग्य, पोलिस, मनपा कर्मचारी, रुग्णवाहिका चालक हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेणारे, त्यांचा सत्कार करणारे योद्धेही पडद्या मागून सेवा देत आहेत. त्यात नाशिकरोडमधील उमेश शिंदे व साई सोशल फाउंडेशनचे सर्वच सभासद यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागते.
कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने रुग्णांना तसेच सर्व नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने माणुसकी जोपासत आपापल्या कर्तव्यांचे निर्वहन केले. ह्या जगात पैसा श्रेष्ठ नसून माणुसकी व सेवाभावी वृत्तीच सर्वश्रेष्ठ आहे हे संपूर्ण जगाने अनुभवलेली माणसातली कृती. दरम्यान कोरोना चा संसर्ग इतक्या प्रमाणात वाढला होता की कोरोना सोबत भीतीचा संसर्ग अधिक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत होते, मनुष्य जीव भयभीत अवस्थेत जगत होता आपल्या कुटूंबातील किंवा मित्रपरिवारातील कोणी जिवलग व्यक्ती जरी दगावला तरी त्याच्या अंत्यविधीचे सोपस्कार न करता येण्याचे दुर्दैव जवळपास सर्वांचाच नशिबी आले, अशी बिकट परिस्थिती असताना देखील आरोग्यदुत, पोलीस, सरकारी यंत्रणा, रुग्णवाहिका चालक, अंतिम संस्कार करणारे स्मशानातील कर्मचारी यांनी मात्र आपल्या जबाबदारीपासून कधीही पळ काढला नाही, त्या खऱ्या युद्धांचा योग्य तो सन्मान व सत्कार होणेही तितकेच गरजेचे आहे, ह्या उदात्त हेतूने प्रेरित होत नाशिकरोडमधील उमेश शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच साई सोशल फाऊंडेशन व शिवसेना शाखेच्या माध्यमातून कोरोना काळात रुग्णांची ने आण करण्याकरिता रात्रंदिवस निस्वार्थ सेवा करणार्या रूग्णवाहिका चालकांचा आदर सत्कार करण्यात आला. या वेळी रुग्णवाहिका चालक शिवा गायधनी, फैयाज सय्यद, श्याम गांगुर्डे, विठ्ठल गायकवाड, युवराज निकम, नाना पवार, शरद तेलोरे, संजय सांगळे, आकाश जारस, शेखर गायधनी, योगेश धोंगडे, महेश सोनवणे, राहुल गायकवाड, मंगेश रामराजे, देवा कातकडे या सर्व कोरोना योद्ध्यांचा जेलरोड इंगळेनगर येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती रुग्णवाहिका चालक यांनी सर्वांचे आभार मानले व नागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी सतर्क व सजग राहावे तसेच शासनाचे सर्व नियम पाळावेत असे आव्हान केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उमेश शिंदे, तसेच साई सोशल फाऊंडेशनचे योगेश नागरे, भाऊसाहेब इंगळे, पंकज गाडगीळ, भैया बाहेती’ शांताराम घंटे, कुंदन शहाणे, शैलेश शिंदे, विपीन सगर, अंकुश कुलकर्णी, रवी भोसले, प्रवीण शहाणे, मनोज काशिद,सचिन जाधव, योगेश माळवे, रिंकू पुरोहित, सागर वाबळे, किशोर सोनवणे, कुलदीप आढाव, गणेश नागरे, मुन्ना नागापूरकर, मायकल खरात यांनी परिश्रम घेतले.