खादी ग्राम उद्योग येथील कर्मचाऱ्यांचा इनर व्हिल क्लबच्यावतीने गौरव
उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशाला ज्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे, त्या राष्ट्रध्वजाचे कापड उदगीर येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग सेंटर येथे तयार होते. त्या खादी ग्रामोद्योग सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक करून इनरव्हील क्लबच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केला. त्यांना भेटवस्तूही दिल्या. त्यांच्या कार्याचे कौतुक करून राष्ट्रध्वजाचे कापड कसे बनते? हे हि इनरव्हील क्लबच्या महिलांना प्रत्यक्ष दाखवले, या सत्कार समारंभाचे आयोजन कार्यक्रम प्रमुख सौ. स्वाती जेटूरे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी मराठवाडा खादी ग्राम उद्योग सेंटरच्या कामात गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व गेल्या चार वर्षापासून संचालक म्हणून नियुक्त झालेल्या शकुंतला ज्ञानोबा शेळके व उत्तम गायकवाड यांचीही प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले, सचिव सौ. शिल्पा बंडे, उपाध्यक्ष सौ. स्वाती गुरूडे, सहसचिव सौ. नीलिमा पारसेवार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, आयएसवो स्नेहा चणगे, संपादक पल्लवी मुक्कावार व वर्षा तिवारी, शकुंतला पाटील यांनीही याप्रसंगी परिश्रम घेतले. उदगीर शहरामध्ये या कार्यक्रमाचे कौतुक केले जात आहे. अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या या कारागिरांना फारसे मानाचे, सन्मानाचे योग येत नसतात मात्र इनर व्हील क्लब ने त्यांचा यथोचित गौरव केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.