स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय समितीकडून कव्हा गावातील विकास कामाची पाहणी
लातूर (प्रतिनिधी) : स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय मुल्यमापन समितीकडून कव्हा गावची पाहणी देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, विस्तार अधिकारी व्ही.एस.कांबळे यांच्या उपस्थितीत आलेल्या पथकाकडून मंगळवारी करण्यात आली. यावेळी कव्हा ग्रामपंचातीच्यावतीने उपसरपंच किशोर घार, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी यांच्यासह पंचाच्या उपस्थितीत स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय मुल्यमापन समितीचे स्वागत करण्यात आले. कव्हा येथील पाहणी दौर्यामध्ये देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, विस्तार अधिकारी व्ही.एस.कांबळे यांच्या उपस्थितीतील तपासणी पथकाने कव्हा येथील गुमास्ता नगर भागातील शाळेची पाहणी, मियावॉकी प्रकल्पाची पाहणी तसेच कव्हा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, श्री.शिवाजी ग्रंथालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा या बरोबरच इतर उपक्रमाची पाहणी करून ग्रामपंचायत कव्हा कार्यालयामध्ये सर्व पाहणी करण्यात आलेल्या बाबींचे मुल्यमापन करण्यात आले.
यावेळी शिवशरण थंबा, नामदेव मोमले, नेताजी मस्के, गोपाळ सारगे,रसुल पठाण, काका घोडके, रसुल सय्यद, ए.एम.अंबुलगे, शरद पाटील, नितीन स्वामी, लक्ष्मण सुर्यवंशी, तालीब पठाण, अंगणवाडी शिक्षीका शोभा बरूरे, जि.प.च्या मुख्याध्यापिका वर्षा अंबुलगे, मोरे, राजीव नगरचे मुुख्याध्यापक दिनकर गौंडगावे, आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक नितीन स्वामी, सुनिता सारगे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. या पाहणी दौर्यात कोरोणाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले होते.