गोदावरी नदीतील पानवेली काढायला सुरुवात
चंदोरी / निफाड ( रोहित टोंम्पे ) : गोदावरी नदीला पूर आल्यानंतर गोदाकाठ भागातील चांदोरी सायखेडा गावामध्ये पुराचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत होते त्यामुळे पूर पाण्याला कारणीभूत असणाऱ्या पानवेली काढायला सुरुवात झाली आहे.
सायखेडा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर असणाऱ्या पुलाजवळील पानवेली काढायला सुरुवात झाली आहे,आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गडाख यांच्या मागणीनुसार सायखेडा पुलाजवळ पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पानवेली काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार केला होता जलसंपदा विभागाने पानवेली काढायला परवानगी दिल्यानंतर बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पानवेली काढायला सुरुवात झाली आहेसायखेडा येथील संपूर्ण पानवेली यापुर्वी काढण्यात आल्या होत्या.दि. /७/२०२१ रोजी झालेल्या पावसाने गोदावरी नदीस पुर आल्याने एकलहरे बंधा-यातून वाहून आलेल्या पानवेली सायखेडा पुलाला येऊन आडकल्या होत्या .
त्या काढण्याचे काम पुन्हा सुरु केले.