गोदकाठच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – डॉ भारती पवार

गोदकाठच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - डॉ भारती पवार

निफाड ( दत्तू वाघ ) : नुकत्याच झालेल्या केंद्रीयमंत्रीमंडळ विस्तारात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मंत्री पदाला वर्णी लागलेल्या डॉ भारती पवार यांचे प्रथमच निफाड तालुक्यातील चांदोरी येथे आगमन झाल्याने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत डॉ पवार यांचे स्वागत केले.  या वेळी सामाजिक कार्यकर्ते शरद नाठे यांनी डॉ पवार यांचा सत्कार केला व निफाड तालुक्यात वाढत असलेल्या डेंगू ,चिकणगुणीय रोगाचा साथि वर ठोस उपाययोजना होण्यासाठी  निवेदन देण्यात आले. तसेच चांदोरी गटाचे जि.प सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी डॉ यांचा सत्कार केला व  चांदोरी येथे राष्ट्रीयकृत बँक सुरू व्हावी या साठी निवेदन देण्यात आले.   निफाड तालुका भाजप युवा मोर्च्या चे आदेश सानप ,डॉ सारिका डेर्ले , भागवत बोरस्ते , जि.प सदस्य यतीन कदम यांनी स्वागत केले.  या वेळी शरद नाठे ,जि.प सदस्य सिद्धार्थ वनारसे ,  अनिल भोर ,सागर गायखे ,ओंकार टर्ले , सोमनाथ कोटमे , योगेश सोनवणे ,गणेश शिंदे , माधव बोरस्ते , साईनाथ काळे , डॉ सारिका डेर्ले , किरण गडाख, सचिन गाडे , देविदास टर्ले , शिवनाथ कडभाने,  जगन्नाथ कुटे,अविनाश पोरजे ,संदीप रोकडे,आकाश गायकवाड,  आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!