पाहणारे डोळे मदत करणारे हात उपक्रमात नोंदणी करण्याचे माधव केंद्रे यांचे आवाहन
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री रोकडोबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केंद्रेवाडी व श्री साई गणेश मिल्ट्री फाऊंडेशन रूध्दा पाटी अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठवाडयातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता १० उत्तीर्ण झालेले पण ९०% पेक्षा जास्त गुण आहेत असे पाल्य जे अत्यंत गरीब, होतकरू अनाथ विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी आत्महत्याग्रहस्त शेतकरी पाल्य आईवडील गमावलेले पाल्य सालगडी पाल्य शेतमजूरपाल्य तसेच ७० वयापेक्षा जास्त वय असणारी निराधार वयोवृध्द व्यक्ती ज्यांचा कोणीही सांभाळ करत नाही. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक जिल्हातून एका शिक्षकास गुरू गौरव ‘ शिक्षकरत्न पुरस्कार दिला जातो. वरील पात्र असे वयोवृद्ध व्यक्ती व विद्यार्थ्यांनी व शिक्षक यांनी 15 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी असे आव्हान अनिरूध्द केंद्रे, शिवहार केंद्रे माधव केंद्रे नागनाथ केंद्रे यांनी केले आहे
संपर्क
श्री माधव शिवहार केंद्रे
(9420886176/ 7385865050)
( महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते )
मुख्याध्यापक श्री. नागनाथ शिवहार केंद्रे
(9689026164/ 8668221833)
मुख्याध्यापक
( डॉ.बाबासाहेब आंबेडकर केंद्रिय निवासी निवासी शाळा अहमदपूर)
टीप -भविष्यातील कोरोना रोगाची परिस्थिती पाहून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येईल.