आरोग्य उपकेंद्र रुद्धा येथील सिस्टर पोपलाइत यांची बदली व ज्योती खुडे यांची नियुक्ती

आरोग्य उपकेंद्र रुद्धा येथील सिस्टर पोपलाइत यांची बदली व ज्योती खुडे यांची नियुक्ती

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रूध्दा उपकेंद्र येथील सिस्टर पोपलाइत यांची नुकतीच बदली झाली असुन सदरील ठिकानी ज्योती खुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना ग्रामपंचायत सदस्य युवराज भगवानराव बदने यांनी सांगितले की आरोग्य उपकेंद्र मौजे रुद्धा ता.अहमदपूर यांच्या अंतर्गत असलेल्या आमच्या आई समान सिस्टर पोपलाइत मॅडम यांनी 30 जून 2014 ते 31 जुलै 2021 पर्यंत सलग 07 वर्ष रुद्धा वाशीयांची व परिसरातील जनतेची सेवा केली.
मॅडम आपण माझ्या गावात व परिसरात जी सेवा केली ती सेवा एक सिस्टर म्हणून नाही तर एक रुद्धा वाशीयांच्या व परिसरातील जनतेच्या मातोश्री म्हणून आमची तुम्ही काळजी घेतली. मॅडम आपल्या बरोबर मी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना आपला मला खूप सहवास लाभला यामध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्तीची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे काम केले.
या जगावर कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपण कुटुंबाची व स्वतः ची काळजी न घेता आरोग्य केंद्र आंधोरी व उपकेंद्र रुद्धा या अंतर्गत आपण जे काम केले खरच ते काम उल्लखनिय व गौरवशाली आहे असे मनोगत व्यक्त केले. तसेच नवीन रुजू झालेल्या सिस्टर ज्योती खुडे मॅडम यांचे पण स्वागत करून त्यांनी पण आपल्या कर्तव्यास तत्पर राहून काम करावे आमचे तुम्हास सतत सहकार्य राहील असे सांगितले. यावेळी छोट्या खानी सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी सिस्टर ज्योती खुडे यांचा सत्कार सुंदरमामी ज्ञानोबा नागरगोजे यांनी केला व सिस्टर पोपलाइत यांचा सत्कार सरपंच वंदनाताई आण्णाराव केंद्रे यांनी केला. यानंतर सिस्टर पोपलाइत यांनी बोलताना सांगितले की रुद्धा ग्रामस्थांनी व परिसरातील जनतेने मला एवढे सहकार्य केले की मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही परंतु मी जरी आपल्या गावी सेवेत नसले तरी माझीच सहकारी सिस्टर सौ. ज्योती खुडे मॅडम या पण आपली काळजी घेतील आणि मी जरी तुमच्या सोबत नसले तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला माझे सहकार्य मार्गदर्शन राहील.

यानंतर उपकेंद्र रुद्धा येथील अधिकारी डॉ.नाईक यांनी पोपलाइत यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व नवीन सिस्टर ज्योती खुडे यांचे स्वागत केले. रुद्धा नगरीच्या सरपंच वंदनाताई आण्णाराव केंद्रे यांनी सिस्टर पोपलाइत व माझे एक सरपंच व कर्मचारी असे नाते राहिले न्हवते तर एक मैत्रीचे नाते आमचे होते असे म्हणत सरपंच यांनी भावुक होऊन निरोप देताना मॅडम तुम्ही आमच्या सोबत नसलो तरी तुमचे विचार तुमचे कार्य हे आमच्या सोबत राहून आम्हास प्रेरणा देतील असे सांगितले व नवीन सिस्टर ज्योती खुडे यांचे पण स्वागत केले. यावेळी सरपंच वंदनाताई आण्णाराव केंद्रे, उपकेंद्र रुद्धा येथील अधिकारी डॉ. नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री युवराज बदने, ग्रामपंचायत सदस्या उर्मिलाताई संदीप केंद्रे, डॉ.आशिष केंद्रे आशा कार्यकर्ती आशाताई केंद्रे, आरोग्य कर्मचारी श्रीमती सुवर्णा केंद्रे उपस्थित होते.

About The Author