श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय पट्टीवडगाव ची सांची वाघमारे बीड जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत सहावी

अंबेजोगाई (गोविंद काळे) : तालुक्यातील पट्टीवडगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी सांची सत्यपाल वाघमारे ही इयत्ता आठवीच्या एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षेत बीड जिल्ह्यातून एस सी कॅटेगिरी मधून सहावी आली तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
2007- 08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स अर्थात भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित केली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या गुणवत्तेस अधिक वाव देण्यासाठी त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावं हा या योजनेचा गाभा आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव आलं तर अशा प्रज्ञावान विद्यार्थ्याला दरमहा एक हजार रुपये (वार्षिक 12 हजार रुपये )शिष्यवृत्ती दिली जाते चार वर्षांमध्ये 48 हजार रुपये या विद्यार्थ्यांना मिळतात. अहमदपूर तालुका पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य तथा सामाजिक चळवळीतील अग्रेसर कार्यकर्ते सत्यपाल वाघमारे यांची सांची वाघमारे ही कन्या आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री धावरे व सर्व स्टाफ च्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच युवा नेते गोविंद तारसे, सरपंच प्रभावती कांबळे पत्रकार ज्योतिबा जाधव , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष महादू वाकडे, पंचायत समिती माजी उपसभापती दिनकर गुरुजी सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, कबीर वाघमारे, गौतम खंडागळे, बंडू कांबळे सुरेश कांबळे नागनाथ कांबळे आनंद वाघमारे नवनाथ उपाडे ग्रामपंचायत सदस्य नारायण लव्हारे माजी उपसरपंच मधुकर लाव्हारे, कारभारी लव्हारे परमेश्वर वाकडे गुरुजी सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव समाज भूषण संजय भाऊ कांबळे विद्रोही कवी राजेंद्र कांबळे शिवछत्रपती पुरस्कार विजेते धर्मपाल मामा गायकवाड श्रीकांत भाऊ बनसोडे समाजिक कार्यकर्ते मधुकर कांबळे युवा नेते सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी विनय कुमार ढवळे दयानंद वाघमारे बाबासाहेब वाघमारे उत्तम कांबळे गुरुजी बा ह वाघमारे गुरुजी आदींनी अभिनंदन केले.