जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त डॉ. शीतल पेद्दावाड व सचिन निलंकर यांचा गौरव,जागतिक दृष्टिदान दिन उत्साहात साजरा

0
जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त डॉ. शीतल पेद्दावाड व सचिन निलंकर यांचा गौरव,जागतिक दृष्टिदान दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल पी उगीले) जिव्हाळा ग्रुप उदगीर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि उदयगीरी लॉयन्स नेत्र धर्मादाय रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षक विश्वनाथराव मुडपे व रमाकांत बनशेळकीकर यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक दृष्टिदान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष विश्वनाथराव माळेवाडीकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनोहरराव पटवारी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी संचालक विस्तार शिक्षण प्रा. डॉ. अनिल भिकाने तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील उपस्थित होते.
यावेळी उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या मुख्य नेत्रतज्ज्ञ डॉ. शीतल पेद्दावाड यांना नेत्रसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “डॉ. भालचंद्र स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच नेत्र सहाय्यक सचिन निलंकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी “उत्कृष्ट नेत्र तंत्रज्ञ सेवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
डॉ शीतल पेद्दावाड यानी सांगितले की, एक वर्षाच्या बालकापासून कोणीही नेत्रदान करू शकते, तसेच मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आत नेत्रदान प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यामुळे तात्काळ नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ अनिल भिकाने यानी त्यांच्या भाषणात नेत्रदानाचे महत्त्व विशद करताना नेत्रदान हे महादान असल्याचे सांगितले. मृत्यूनंतर नेत्रदानाद्वारे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा मनोहरराव पटवारी यानी समाजात नेत्रदानाविषयी व्यापक जनजागृती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करताना, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. बळीराम भुक्तरे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव प्रा. एस. एस. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे मुरलीधर जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सौ. अरुणा भिकाने यांनी आपले मनोगतातून सत्कारमुर्तीच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात अरुणा ओसवाल अंध विद्यालयाचे चव्हाण व त्यांच्या विद्यार्थ्याच्या चमुने तसेच विठ्ठलराव फुलसे यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. देविदासराव नादरगे यांनी प्रास्ताविकातून जागतिक दृष्टिदान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिडवई यांनी केले, तर आभार प्रदर्शन दशरथराव शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडूरंग बोडके, बाबुराव वाघमारे, गणेश मुंडे, प्रशांत पांचाळ, शशीकांत पाटील, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास प्राचार्य बाबुराव लहाने, रोटरी क्लबचे सचिव विक्रम हालकीकर, पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर, रामविलास नावंदर,प्रा. बाबुराव माशाळकर, माजी प्राचार्य डॉ सतीश कुलकर्णी, मोहनराव खिंडीवाले, योगशिक्षक शिवमूर्ती भातांब्रे, मनोहर कुलकर्णी, सोपानराव माने, शंकरराव साबणे, नवनाथ पाटील, वैजनाथ पंचगल्ले, चंद्रकांत रोडगे, दिलीप कंधारे , लहुदास याचावाड, वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितानी यावेळी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!