नणंद येथील ग्रामसेवकास निलंबित करा – आण्णासाहेब मिरगाळे
निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील मौजे ननंद येथील ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. निलंगा तालुक्यातील मौजे. ननंद येथे गेली सहा महिन्यापासून गावामध्ये नालेसफाई तसेच कीटकनाशक फवारणी झाली नाही. मागिल दहा वर्षापासून ग्रामसेवक साहेब गावामध्ये ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत. ग्रामसेवकास वारंवार सांगून व निवेदन देऊन सुद्धा ग्रामसेवक डी.आर. भोसले यांनी नालेसफाई व कीटकनाशक फवारणी केली नाही. त्यामुळे आज गावांमध्ये डेंग्यू व मलेरिया सारखे साथीचे रोग पसरले आहेत. नालेसफाई व कीटकनाशक फवारणी झाली असती तर गावांमध्ये डेंग्यू मलेरियाचा प्रसार झाला नसता. गावामध्ये अनेक लोक डेंगू व मलेरियामुळे आजारी पडत आहेत. लहान मुलांमध्ये सुद्धा आजाराचे प्रमाण वाढले आहे. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यानी दोन वेळेस ग्रामसेवक साहेबांना निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे युवा सेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे निवेदन गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली आहे. निवेदनावर युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, उद्धव जाधव, व्यंकट पाटील, विलास देशमुख, जनार्धन होगाडे, सिद्धेश्वर पाटील, रामेश्वर मिरगाळे, सिद्धेश्वर उस्तूरे, राजकुमार तांबाळे, बालाजी नारायणपूरे, हासीम पटेल, राम लादे, कुमार लादे, बळवंत तांबाळे, महेश स्वामी इत्यादीच्या स्वाक्षर्या आहेत.