प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित
परभणी (गोविंद काळे) : लायन्स क्लब परभणीच्या वतीने दरवर्षी शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांना देण्यात आला. प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे हे शारदा महाविद्यालय परभणी येथे इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून मागील अठरा वर्षा पासून कार्यरत होते. त्यांनी महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या अध्यापन व संशोधना सोबतच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक म्हणून सुद्धा चांगले कार्य केले आहे. त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे विद्यार्थी विकास विभाग संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून लॉयन्स क्लब परभणीच्या वतीने त्यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी लॉ. प्रा. एस. आर. गुजराथी, लॉ. ऍड. ज्ञानेश्वर दराडे, लॉ. डॉ. प्रवीण धाडवे, लॉ. विजय दराडे, लॉ. अरुण मराठे इ. उपस्तिथ होते. त्यांच्या या पुरस्काराबद्दल मा. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. शिवराज बोकडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री परमेश्वर हासबे व डॉ. दिपक बच्चेवार आदीनी अभिनंदन केले.