नीता मोरे एक उपक्रमशील शिक्षिका – बाळासाहेब पाटोदे

नीता मोरे एक उपक्रमशील शिक्षिका - बाळासाहेब पाटोदे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील शिक्षिका सौ. नीता मोहनराव मोरे यांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सह्याद्री डेव्हलपर्सच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या प्रसंगी सह्याद्री डेव्हलपर्सचे प्रमुख बाळासाहेब पाटोदे यांनी बोलताना स्पष्ट केले की,सौ. नीता मोरे या उपक्रमशील शिक्षिका असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. विद्यार्थ्यांची जडणघडण हा शिक्षकाचा पिंड असतो. त्या सोबतच विद्यार्थी हा परिपूर्ण झाला पाहिजे. त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांना बोलते करणे,वक्ता बनवणे,सभाधिटपणा निर्माण करणे. विद्यार्थ्यांना लिहायला शिकविणे अर्थात त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील लेखक,कवी जागा करणे,  आणि त्यांना लिहितं करणे ही कला फार कमी शिक्षकाकडे असते. निता मोरे या त्यात परिपूर्ण आहेत. त्यांचा आदर्श विचार शिक्षकांनी घ्यावा. असेही आवाहन याप्रसंगी बाळासाहेब पाटोदे यांनी केले. या सत्कार समारंभासाठी सतीश पाटील मानकीकर, आनंद भोसले, कपिल धनशेट्टे, रोहित हिवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलतांना बाळासाहेब पाटोदे म्हणाले की, मोरे यांनी खूप मेहनतीने विद्यार्थी घडवले आहेत. आज मोठमोठ्या पदावर असलेले विद्यार्थी आवर्जून त्यांचा उल्लेख करतात. हेच त्यांच्या कामगिरीचे यश आहे. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सौ. नीता मोरे यांनी स्पष्ट केले की, उदगीरकर यांनी दिलेलं प्रेम आणि आपल्या वडिलांची शिक्षकी पेशा वरील निष्ठा या गोष्टी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी काम करत आहे. प्रमाणिक कार्य करणे एवढाच माझा हेतू असून भविष्यात अशाच पद्धतीचे कार्य करेन असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पाटील मानकीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल धनशेट्टे यांनी केले.

About The Author