सर्वसामान्य तळागाळातील माणूस डोळ्यासमोर ठेवून व सामाजिक बांधिलकी जपून काम करणार – मा. मधुसूदन कांडलीकर
अहमदपूर (गोविंद काळे) : सर्वसामान्य, तळागाळातील माणूस, डोळ्यासमोर ठेवून, व सामाजिक बांधिलकी जपून, काम करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलीकर यांनी केले. ते लहुजी साळवे, कर्मचारी महासंघ लातूरच्या वतीने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना बोंलत होते.
यावेळी लसाकम संस्थापक, नरसिंग घोडके यांच्या शुभ हस्ते, प्रबोधन निवासस्थानी, जालना येथे अभियंता मधुसुदन कांडलीकर यांची बदली झाली असल्याने निरोप समारंभ ठेवुन सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, लसाकम माजी प्रांताध्यक्ष, बी.बी. गायकवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाजकल्याण सभापती, जि. प. लातूर संजय दोरवे, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, कार्यकारी अभियंता म.न.पा. लातूर नागनाथराव कलवले, लसाकम महासचिव राजकुमार नामवाड, माजी प्रांत सचिव तथा ज्येष्ठ मार्गदर्शक शिरीष दिवेकर, जिल्हा सचिव मधुकर दुवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांनी मधुसूदन कांडलीकर यांच्या कामाचे कौतुक केले. कांडलीकर सरांची नेहमीच, सर्वसामान्य जनतेसाठी, तळमळ, धडपड राहिलेली आहे, आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वांना न्याय, मिळवून देण्याचा सर नेहमीच प्रयत्न करीत असतात. अशा भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कांबळे, यांनी केले, तर उपस्थितांचे आभार छगन घोडके, यांनी मानले. यावेळी कोरोनाचे नियम पाळुन लसाकमचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.