मान्यवरांच्या उपस्थितीत १८ सप्टेंबर रोजी शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर मिशन वृत्तपत्राचा आठवा वर्धापन दिन व शिवदर्शन फांऊडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रशासनासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना मानाचा शिवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येत असते. लातूर मिशन वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम राबविला जातो. लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्यावर उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या निमित्ताने केला जातो. आत्तापर्यंत ५५ कर्तृत्ववान व्यक्तींना शिवरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष ह.भ.प. रामायणाचार्य प्रशांत महाराज चव्हाण खानापूरकर , उद्घाटक म्हणून मा.ना. संजय बनसोडे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी लातूर, माजी आ. ॲड. त्र्यंबकनाना भिसे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. विक्रांत गोजमगुंडे महापौर लातूर, मा. युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी, लातूर, मा. संतोष सोमवंशी सदस्य लातूर जिल्हा नियोजन समिती, मा. जयप्रकाश दगडे जेष्ठ पत्रकार लातूर यांची उपस्थिती राहणार आहे. यावर्षीचा २०२१ शिवरत्न पुरस्कारासाठी खालील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
सुर्यकांत सुडे (सरपंच हरंगुळ बु.), डॉ. लक्ष्मण देशमुख (जिल्हा शल्य चिकित्सक, लातूर), शाम गोडभरले (गटविकास अधिकारी पं.स., लातूर), अनिल कांबळे (जिल्हा जलसंधारण अधिकारी, लातूर), डॉ. जयपक्राश दरगड (प्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर), महादेव आसलकर (तंत्र अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर), निळकंठ पवार (प्रशासकीय समन्वयक, जेएसपीएम संस्था, लातूर), उत्तम गोमसाळे (ग्रामसेवक, लातूर), शिवाजी हेडगे (मुख्याध्यापक, श्री केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर), दत्तात्रय शिंदे (तलाठी सज्जा, लातूर),संगम कोटलवार (संपादक, दै. सारथी समाचार), सर्फराज मणियार (अध्यक्ष, सहारा ग्रुप, लातूर), अमित तिकटे (डिजीटल मिडया, लातूर), तेजस धुमाळ (संगित कला क्षेत्र) या मान्यवरांना या वर्षीचा शिवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात लातूर मिशन वृत्तपत्र व शिवदर्शन फांऊडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शिवरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या पाठिवर कौतुकाची थाप देण्यासाठी या पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळयाला आपण दि. १८ सप्टेंबर २०२१ वार शनिवार रोजी सकाळी १०.३० वा. स्थळ : कृष्णा मंगल कार्यालय, सोनाई (कोंबडे) पेट्रोलपंप समोर, ५ नंबर चौक, लातूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन भारत जाधव मुख्य संपादक लातूर मिशन वृत्तपत्र तथा अध्यक्ष शिवदर्शन फाऊंडेशन लातूर, उपसंपादक परमेश्वर घुटे, कार्यकारी संपादक सुरेश काचबावार, सल्लागार मंडळ – अॅड. अजीत काळदाते, प्रा. तानाजी घुटे, अॅड. उमाकांत जे. नाईकनवरे, कैलास साळुके, श्रीराम गायकवाड,शिरीषअप्पा हत्ते, दयानंद माने, ॲड. नामदेव शिंदे, शंकर जाधव, प्रा.बालाजी वाघमारे, गोविंद जगताप, कुमार भालेराव. विशेष प्रतिनिधी – दिपक बोराडे पाटील, तुकाराम जोगदंड, अजित दुटाळ, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, बालाजी कांबळे, कैलास ढोले, गोविंद वाघमारे, विकास भंडे, प्रदिप शिंदे, उमाकांत माळी, अनिल शेळके, दिपक शिंदे, शुभम चव्हाण, ओमकार सरडे, गणेश पाटील, संतोष मगर, प्रकाश चिंताले, लखन सावंत, ऋषिकेश मोरे, राजेश बंडगर, संपत भिसे, अजीत माने.आदींनी केले आहे. सदर कार्यक्रम कोरोना नियमाचे पालन करून संपन्न होणार आहे.