मतदार संघात विकास कामाच्या धुमधडाक्यामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा – आ. बाबासाहेब पाटील
भारतीय जनता पार्टीचे आंदोलन शेतकऱ्यांची दिशाभुल करण्यासाठीच
एफ आर पि रक्कम 15 ऑक्टोबर पर्यंत जमा करणार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर साखर कारखाना गळीत हंगाम 2020_21 मध्ये कारखान्याने 54 26 93 मे टन ऊसाचे गाळप केलेले असुन 530 200 क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. आता पर्यंत 1900 रु प्रती मे टन प्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली आहे. कारखान्याने केंद्र शासणाच्या धोरणानुसार साखर निर्यात केली असुन त्या पासुन सुमारे 11 कोटी रुपये अनुदान येणे अपेक्षीत आहे. सदरची रक्कम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे तसेच सध्या कारखान्याची साखर विक्री सुरु असुन त्या पासुन हि रक्कम येत आहे वरील दोन्ही पैकी जी रक्कम लवकर उपलब्द होईल त्या मधुन प्रती मे टन रु 200 प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल अशी माहिती आमदार तथा सिद्धी शुगर चे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच ऊर्ध्व मनार उपसा सिंचन हि मराठवाड्यातील बहुदा एकमेव लिफ्ट सुरु असुन त्यापासुन कारखान्यांकडे सुमारे 1 लाख मे टन ऊस गळीता साठी येत आहे तसेच कॅनलचे विस्तारीकरणाचे काम सुरू केलेले असुन त्यामुळे आणखी जादा क्षेत्र ओलीता खाली येणार आहे अहमदपूर चाकुर तालुक्यातील व इतर आजुबाजुच्या तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याची माहीती आहे त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही परंतु ज्यांच्या स्वत : चा ऊस इतर कारखान्याकडे जातो त्यांनी सध्या धुमधडाक्यात आमदार फंडातुन व विविध योजना मधुन सुरु असलेली विविध कामे पाहुन पोट दुखीतुन धरणे आंदोलन या सारखे उद्योग सुरु केले आहेत जर त्यांना खरोखरच शेतकऱ्यां बद्दल प्रेम असेल तर एखादा बंद पडलेला साखर कारखाना सुरु करावा तसेच शेतकऱ्यांच्या विरुद्ध केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत ते रद्द करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे पेट्रोल डिझल गॅस चे दर कमी करण्यासाठी आंदोलन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले कारखान्याची एफ आर पि ची रक्कम रु 2082:73 इतकी असताना कारखान्याने 2100 रु अदा करण्याचे ठरविले आहे त्यामुळे कारखान्यास जवळपास 01 कोटी रु जादा द्यावे लागत आहेत तसेच कारखान्याने 2011-12 हंगामा पासुन आत्तापर्यंत जवळपास 1000 =00 कोटी ( एक हजार कोटी ) ऊस बिल म्हणुन अदा केले आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.