सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने “उत्सव बाप्पाचा” स्पर्धा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने गेली दहा दिवस “उत्सव बाप्पाचा” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना सहभाग दिला गेला होता. शाळेमधील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली यामध्ये समर्थ गणेश वारंवार, शर्वरी घाडगे, संस्कृती वारलवाड, आयुष गोरेवार, तनुष गोरीवार या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले दिग्दर्शक श्री नागेश सर त्यांनी खूप मेहनत घेतली.
या स्पर्धेत विविध गटातील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदवला यास सर्व स्पर्धांमध्ये सहभागी विजेत्या स्पर्धकांना लवकरच पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे असे संचालक कुलदीप हाके यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवालिकाताई हाके तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाघाट पॉलिटेक्नीक चे प्राचार्य नितीन शिवपूजे, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन अरदवाड, सुहास दहीटनकर, कालिदास पिटाळे, श्रुती मेनकुदळे, रूपा पाटील, आरती पुणे, संतोष लातूरे, गणेश एमगीर, निळकंठ नंदागवळे, मंगेश चव्हाण, पंचाळ विजय, कुलकर्णी विजय,सतीश केंद्रे , सिद्धू मासोळे, बालाजी देवक्तते, शरण हंद्राळे तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य ऋत चक्रनारायण, शुभांगी सूर्यवंशी, भरत कानवटे, निजामुद्दीन मलकानी, दीपक बिरादार, चंद्रकला कळवते या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वी करिता मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्राचार्य ऋत चक्रनारायण यांनी मांडले.