शेतकऱ्यांनी कृषी ॲपचा वापर करणे म्हणजे काळाची गरज : कृषीकन्या निकिता पवार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील लेंडेगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय गोळेगाव येथील कृषिकन्या निकिता नामदेव पवार यांनी ग्रामीण कृषि जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी ॲप विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच ई- पीक पाहणी ॲप एग्रोटेक व्ही एन एम के व्हि, भारत ॲग्री यांचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच सर्व प्राध्यापकांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना ही माहिती दिली. यावेळी शेतकरी धोंडीराम पवार, पांडुरंग पवार, रावसाहेब पांढरे, संभाजी माने, लिंबाजी पवार, शिवराज बेंबडे व अनेक शेतकरी या वेळी उपस्थित होते.