हिवरा येथे अखेर ग्रामपंचायतच्या तोफा थंडावल्या

हिवरा येथे अखेर ग्रामपंचायतच्या तोफा थंडावल्या

मतराजा कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता

महागाव (राम जाधव) : तालुक्यातील हिवरा संगम येथे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पॅनलमधील राजकीय पक्षाकडून एकमेकांवर चिखलफेक करत आरोप-प्रत्यारोप केले जात होते.अखेर काल दिनांक 13 जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी प्रचाराच्या तोफा थंडाऊन त्या मान्य झाल्या आहेत.यामधील कोणाला संधी मिळणार ते 18 जानेवारीला निकालानंतर स्पष्ट होणार.

प्रचारच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पॅनलमधील नेत्यांकडून रोड शो करत जंगी सभेचे आयोजन करण्यात आले.त्यामुळे सभेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ही मोठ्या प्रमाणावर झडत होत्या. काल सायंकाळी पाच वाजता प्रचार थंडावणार म्हणून सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा धुरळ उडत होता.संध्याकाळ पासून मात्र राजकीय पुढाऱ्यांनी व उमेदवारांनी छुप्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावर आपल्याच पॅनलला मतदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.तर दिनांक 15 जानेवारी उद्या मतदान होणार असून दिनांक 18 रोजी निकाल लागणार असल्याने उमेदवारांसह मतदारांना ही उत्कंठा लागली आहे.

About The Author

error: Content is protected !!