ओबीसी जनमोर्चा च्या जिल्हा कार्यकारणी अध्यक्षपदी सचिन शेंडगे यांची निवड

ओबीसी जनमोर्चा च्या जिल्हा कार्यकारणी अध्यक्षपदी सचिन शेंडगे यांची निवड

उस्मानाबाद (सागर वीर): ओबीसी जनमोर्चा च्या अध्यक्षपदी सचिन शेंडगे यांची निवड करण्यात आली,त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन प्रकाश शेंडगे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या नियुती पत्रात असे म्हटले आहे की ओबीसी जनमोर्चा ही इतर मागासवर्गीय शेतकरी, बलुतेदार अलुतेदार, भटक्या जमाती, विमुक्त जाती यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी गेली दोन वर्षे कार्यरत असणारी आणि ओबीसी/बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असणारी एक सामाजिक संस्था आहे. ओबीसीना संघटीत करून संविधानाने दिलेल्या त्यांच्या अधिकारासाठी जनजागृती करणे, त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी शासनाकडे आग्रह धरणे, प्रसंगी आंदोलनात्मक पावले उचलणे किंवा न्यायालयीन लढाई लढणे व त्यासाठी त्यांच्यामध्ये प्रबोधन, प्रशिक्षण आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आपल्या संघटनेच्या बांधणीसाठी, मजबूतीकरणासाठी, ओबीसींचे प्रलंबित प्रश्न आणि नव्याने उभी ठाकलेली आव्हाने यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी तळागाळात पोहोचणे आवश्यक आहे. आपण ओबीसी/बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्षे मोलाचे योगदान दिले आहे. आपले सामाजिक क्षेत्रातील कार्य, अभ्यास, अनुभव आणि तळमळ लक्षात घेऊन ओबीसी जनमोर्चा आपली उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करीत असल्याचे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष प्रा.टी.पी मुंडे डॉ.बी.डी चव्हाण, डॉ.ज्ञानेश्वर गोरे, सरचिटणीस रफिक कुरेशी,इंद्रजीत देवकते, लक्ष्मण माने, पिराजी मंजुळे, ॲड.खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, धनंजय शिंगाडे संतोष हंबीरे आदी उपस्थित होते. सचिन शेंडगे यांची नियुक्ती होताच त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author