निलंगा शिक्षक पतसंस्थेची पाच वर्षातील दमदार कामगिरी
सभासदांना 7% लांभाष व नववर्षापासुन व्याजदर 1% कमी
चेअरमन अरुण सोळुंके
निलंगा (प्रतिनिधी) : रोजी झालेल्या निलंगा ता जि प शिक्षक पतसंस्था निलंगा च्या 44 व्या आमसभेच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून शिवाजीराव साखरे (वाघ) शिक्षक नेते महाराष्ट्र राज्य, उद्घाटक म्हणून कालिदासरावजी माने साहेब शिक्षक नेते प्रहार संघटना, प्रमुख पाहुणे म्हणून सौ राधा ताई बिरादार पंचायत समिती सभापती निलंगा यांची उपस्थिती होती. शिक्षक पत संस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके सर यांनी आमसभेचे प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात त्यांनी संबंधित वर्षातील व पाच वर्षातील दिलेल्या वचनाच्या वचनपूर्तीचा आलेख त्यांनी मांडला. आपण केलेली कामे कोणती. शिल्लक राहिलेली कामे. व ती का झाले नाहीत यांचे सविस्तर विवेचन केले. तसेच झालेली विकास कामे व न झालेल्या कामे स्वतः कबूल करून ती कशी पूर्ण करता येतील याबाबत चर्चा करून संबंधित पाच वर्षात तोट्यातून नफ्यात कशी आणली व त्यातून स्वयंपूर्ण कशी करता येईल हेही सांगितले. यासाठी शंभर टक्के वसुली व आमचे निस्वार्थ काम व सर्व सभासदांची आमच्या पाठीमागे खंबीर साथ या जर गोष्टी झाल्या निश्चितच पुढील काळात सोसायटी स्वयंपूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कालिदास राव माने सर,शिवाजीराव साखरे वाघ सर, मा सौ राधा ताई बिरादार यांनी अतिशय सुंदर व मार्मिक अशा प्रकारे मार्गदर्शन केले. दुपार सत्रात माननीय केशव भैया गंभीरे यांनी मागील वर्षी घेतलेले ठराव व पतसंस्थेचा लेखाजोखा वाचन करून दाखवले व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला गंभीरे सर, अरुण सोळुंके, संजय कदम व समस्त संचालक मंडळाने अतिशय समर्पक उत्तरे देऊन समाधान समाधान केले. विशेष म्हणजे संचालक मंडळाचे कार्यच इतके चांगले आहे आहे की, निर्थक प्रश्न सोडले तर सभागृहाला विचारांसाठी प्रश्नच नव्हते. एकंदरीत तोट्या मध्ये चालणारी पतसंस्थेचा चा कारभार घेऊन संबंधित संचालक मंडळाने या पाच वर्षात भत्ता न घेता निस्वार्थपणे पतसंस्थेसाठी अतिशय मोलाची कामगिरी करण्याचे कार्य केलेले आहे. यापूर्वीच्या शिक्षकांनी पै-पै मधून ही सोसायटी उभा केली या सोसायटीत ला अबाधित राखण्यासाठी संबंधित संचालक मंडळाने अरुण सोळुंके, केशव भैया गंभीरे, संजयजी कदम यांच्या नेतृत्वाखाली अप्रतिम कार्य केले आहे .
निलंगा तालुका जि. प.शिक्षक पतसंस्थेचे नेतृत्वाखाली पाच वर्षातील संचालक मंडळांची कामगिरी
1) पस्तीस लाख चाळीस हजार तोटा असलेली पतसंस्था नफ्यात आणून 3%, 6%व यावर्षी 7%लाभांश वाटप करण्यात आला.
2) कर्जमर्यादा पाच लाखावरून 12 लाख करण्यात आली.
3) कर्ज घेत असताना भागभांडवल कपात रक्कम 15% वरुन 10%करण्यात आले.
4) गेल्या पाच वर्षात 11 मयत शिक्षकांचे कर्ज निधी हमी व्याजातून 33,32,036 रू कर्ज माफ करण्यात आले.
5) पतसंस्था संगणकीय करून SMS सुविधा देण्यात आली आहे.
6) पतसंस्था स्वभांडवलावर येण्यासाठी मुदत ठेवी झाल्या.व आर. डी. ची योजना चालू केली आहे.
7) पतसंसथेत महिला भगिनी सभासदांसाठी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम घेतला.
8) प्रत्येक सभासद बांधवाला दरवर्षी कर्जखतावणी स्लिपा दिल्या
9) पाच वर्षात संचालक मंडळांनी भत्ता घेतला नाही.
10) पारदर्शक व काटकसरीने पतसंस्थेचा कारभार करण्यात आला..
11) वचननाम्यातील 17 पैकी 14 मुद्द्यांची पुर्तता करण्यात आली.
सभासद बांधवांनी पतसंस्थेत संचालक मंडळांच्या कारभाराचवर विश्वास ठेवून दीड कोटी रूपये ठेव ठेवली आहे
आमसभेस उपस्थित संचालक केशव गंभिरे, संजय कदम, लखणे धर्मप्रकाश, पाटील चंद्रकांत, गुंडुरे डी बी, धुमाळ डी एस, संजय अंबुलगेकर, सराटे पी जी, दिपाली माने, सुनिता रोळे, उपस्थित होते. सुञसंचलन दयानंद मठपती व आभार संजय कदम यांनी केले.