सर्वसामान्याच्या आरोग्याबाबत राज्य शासन कटीबद्ध – ना. संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : सर्व सामान्याच्या आरोग्याबाबत राज्य शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांनी जन परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीरच्या वतीने आयोजीत मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीरचे सभापती प्रा शिवाजीराव मुळे, उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, धन्वंतरीचे प्राचार्य डॉ दत्ता पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखा पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, नगरसेवक शमशूद्वीन जरगर, शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, जानीभाई सय्यद, मुंतजीब शेख, प्रा बिभीषण मद्देवाड, जबार शेख, मंजुर अहमद आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात ८३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ प्रशांत नवटक्के, डॉ सुहेब अस्लम शेख, डॉ भाग्यश्री घाळे, डॉ विक्रम माने, डॉ सुषमा कोंगे व धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. अस्मिता भद्रे, डॉ प्रियंका ठाकरे, डॉ नम्रता कोरे, मनोज इबतवार, संजय जाधव, अभिषेक देशमुख आदीनी आरोग्य सेवा दिली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक शमशुद्दीन शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रदीप जोंधळे यांनी तर आभार शेख हुसेन यांनी आभार मानले . या शिबीराचे आयोजन अझरोद्दीन शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख हिसाम, शेख मैनोदीन शेख अजहर, खाजा पठाण, शेख असद, शेख अवेस, शेख उमर, शेख फेरोज, शेख अरफात, सोहेल मोमीन आदीनी परिश्रम घेतले.