तालुक्यातील रूई येथे पोखरा योजने अंतर्गत शेती शाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : पोखरा योजने अंतर्गत रुई तालुका अहमदपूर येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत कापूस या पिकावर शेतीशाळा घेण्यात आली सदर शेतीशाळा मध्ये माहिती सांगताना शेतीशाळा प्रशिक्षक शरद हुडे यांनी गुलाबी बोंड आळी चे व्यवस्थित एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याबद्दल ही प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. किड व रोग ओळखून त्यावर ती वेळीच फवारणी करणे गरजेचे आहे व किडींना नियंत्रणात आणण्यासाठी किडींची ओळख अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये अंडी, आळी, कोष, पतंग या अवस्थेमध्ये आपल्याला त्यांचे चक्र दिसून येते. म्हणून कापूस या पिकाचे यामुळे किड व रोग यामुळे आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकाचे औषधे वापरणे गरजेचे आहे. यामध्ये क्विनोलफोस 20 टक्के ac किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 2.5 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के Ac 3 मीली फवारावे . गावातील प्रगतशील शेतकरी गोविंद गाडे तसेच अतुल पाटील सार, दत्ता बंकनवाढ, संतराम लिंगनवाढ, ज्ञानेश्वर मूलमवाढ, परमेश्वर लींगणवाढ, राम राचमले, नरसिंग देवकते, अजय मुलंमवाढ, नामदेव गाडे, गोविंद गाडे, दत्ता देवकते आदी सर्व शेतकरी इत्यादी शेतकरी उपस्थित होते.