हिवरा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये 76 टक्के मतदान

हिवरा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये 76 टक्के मतदान

ग्रामपंचायतचा पुढारी कोण नागरिकांचे लागले लक्ष

महागाव (राम जाधव) : महागाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरा संगम ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. तर चार प्रभागात एकूण 13 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 3 अविरोध सदस्य निवडून आले तर 10 जागेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले असून यामध्ये एकूण मतदान 3007 पैकी 2304 मतदारांनी हक्क बजाविला.तर त्याची टक्केवारी 76.62 टक्के आहे.

तर वॉर्ड क्रमांक 1मध्ये 824पैकी 626, वॉर्ड क्रमांक2 मध्ये 769 पैकी601, वॉर्ड क्रमांक3 मध्ये 678 पैकी 509, वॉर्ड क्रमांक 4मध्ये734 पैकी 568 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. मागील पंधरा दिवसापासून हिवरा येथे दोन पॅनल मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली असून वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सर्वाधिक चुरशीची लढत होतांना बघायला मिळाली असून सरपंचाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गातील निघेल आणि कोण सरपंच होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर दिनांक 18 रोजी निकाल लागणार असून हिवरा ग्रामपंचायत चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारेल याकडे सर्व हिवरा वासीयांचे लागले आहे.

About The Author