मकरसंक्रराती निमित्त विधवा महिलांचा सन्मान; त्याच्या नावामागे विधवा न लावता “सक्षमा” लावण्याचा ठराव – नगरसेविका रागिणी यादव

मकरसंक्रराती निमित्त विधवा महिलांचा सन्मान; त्याच्या नावामागे विधवा न लावता "सक्षमा" लावण्याचा ठराव - नगरसेविका रागिणी यादव

लातूर (प्रतिनिधी) : मकरसंक्राती निमित्त ज्या विशेष गटाला या कार्यक्रमात सहभागी केल जात नाही तो गट म्हणजे विधवा. दि. 14 जानेवारी रोजी मकरसंकराती निमित्त रुढी परंपरेला फाटा देत नगरसेविका सौ. रागिणी यादव यांच्या निवासस्थानी समाजातील सक्षमा महिला,भगिनींचा सन्मान करून या समारोहात सहभागी करण्यात आले व ही परंपरा अशीच राबवन्याचा निश्चय करण्यात आला तसेच पति निधनानंतर त्यांच्या नावामागे लागणारा शब्द म्हणजे विधवा ज्या शब्दानी त्यांच मनोबल खचेल असा शब्द काढुन त्यांना सक्षमपणे उभारणीसाठी सक्षमा हा शब्द लावण्यात यावा अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी सक्षमा श्रीमती सुषमाताई खिचडे ,श्रीमती सुवर्णा महाजन, श्रीमती मीरा देशमुख, श्रीमती सोनवनेताई, प्रा. हमने मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका वनिताताई काळे, प्रा. डाॅ. प्रभा वाडकर, सौ. प्रभाताई तोंडारे, सौ. पुजा शेळके, सौ. संगीता स्वामी, सौ. प्रभावती यादव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author